नेता होताच अजित पवार यांची खेळी; जयंत पाटील यांचा कसा केला उल्लेख पहा?

| Updated on: Jul 04, 2023 | 7:55 AM

तर अजित पवार आणि त्यांच्यासह 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेत शिंदे सरकारमध्ये प्रवेश केला. यानंतर पक्ष विरोधी कारवाई केल्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांसह 9 आमदारांना अपात्र करण्याचं पत्र विधानसभा अध्यक्षांकडे दिलं.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडानंतर आता टोकाचा संघर्ष पहायला मिळत आहे. काल अजित पवार यांच्यासह अनेक आमदार हे बाहेर पडले आहेत. तर अजित पवार आणि त्यांच्यासह 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेत शिंदे सरकारमध्ये प्रवेश केला. यानंतर पक्ष विरोधी कारवाई केल्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांसह 9 आमदारांना अपात्र करण्याचं पत्र विधानसभा अध्यक्षांकडे दिलं. त्याच्यावर अजित पवार यांनी खेळी जयंत पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच त्यांचा एकेरी उल्लेख करताना, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर एक दिवसाआधीच कारवाई करण्यात आल्याने त्यांना तसा आदेश काढता येत नसल्याचे अजित पवार यांनी सांगितलं आहे. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, मी राष्ट्रवादीच्या आमदारांनी आणि पक्षाने निवडून दिलेला विधीमंडळ पक्षनेता आहे. त्यामुळे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना अपात्र करण्याच्या संदर्भात कालच विधानसभा अध्यक्षांकडे पत्र दिलं आहे. मात्र यावेळी त्यांची प्रफुल पटेल आणि छगन भूजबळ यांच्याशी बोलताना त्यांनी जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख केल्याचं दिसत आहे. maharashtra politics

Published on: Jul 04, 2023 07:55 AM
काँग्रेसच्या दाव्यावर शरद पवार म्हणतात, ‘त्यांची मागणी असेल तर…’
सरकारमध्येच अजित पवार आल्याने शिंदे गटाची गोची? नाराजी नाट्यही सुरू; अनेक आमदारांत नाराजीचा सुर