राष्ट्रवादीला ईडीची पीडा! अजितदादा आणि गट भाजपच्या वाटेवर; राऊतांना कोणती शंका?
ईडीची पीडा मागे लागल्यानेच राष्ट्रवादीचा एक गट हा भाजपच्या वाटेवर आहे असा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. तर अजित पवार यांना रोखण्यासाठीच शरद पवार यांनी ही मार्ग पत्करल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अनेक शंकांसह नव्या चर्चांना उत येत आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सगळ्यांमध्येच अस्वस्थता निर्माण झाली. यामागे कारणे काय असा सुर आता उमटत असतानाच ठाकरे गटाचं मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामनातून (Dainik Samana) एक गंभीर बाब समोर आली आहे. ईडीची पीडा मागे लागल्यानेच राष्ट्रवादीचा एक गट हा भाजपच्या वाटेवर आहे असा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. तर अजित पवार यांना रोखण्यासाठीच शरद पवार यांनी ही मार्ग पत्करल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अनेक शंकांसह नव्या चर्चांना उत येत आहे. शरद पवार यांच्या चरणाशी लोळण घातलेल्या लोकांचा एक पाय भाजपत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. यावर संजय राऊत यांनी, अजित पवार (Ajit Pawar) हे वारंवार म्हणतात मी राष्ट्रवादी सोडणार नाही. त्यांनी या अफवांना पुर्णविराम लावायला हवा. पवार कुटुंबियाचं नातं फार घट्ट आहे. मात्र राजकारणात काहीही होऊ शकतं, असं म्हणत राऊत यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर प्रश्नचिन्ह उभा केला आहे. त्यामुळे सध्याची राष्ट्रवादीत सुरू असणाऱ्या घडामोडींवर आणि शरद पवार यांच्या निर्णयावर हा स्पेशल रिपोर्ट