अमरावतीत लव्ह जिहाद झाल्याचा नवनीत राणांचा आरोप, देवेंद्र फडणवीसांना फोन, वाचा नेमकं काय झालं?

| Updated on: Sep 08, 2022 | 12:59 PM

Navneet Rana: खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीत लव्ह जिहाद झाल्याचा आरोप केला. या प्रकरणातील तरुणी आता सापडली आहे. या प्रकरणानंतर त्यांनी फडणवीसांना फोन केला होता.

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी अमरावतीत लव्ह जिहाद झाल्याचा आरोप केला. या प्रकरणातील तरुणी आता सापडली आहे. त्यानंतर नवनीत राणा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्या काळामध्ये अमरावती शहर सुरक्षित नाहीये. अमरावती शहरात लव जिहादचे प्रकरण वाढत चालले आहे.  काल आम्ही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशीही बोललो. गणपतीनंतर लवकरच अमरावतीला नवीन पोलीस आयुक्त येईल, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

नवनीत राणा यांनी अतुल लोंढे यांच्यावर टीका केली आहे. कायद्यानुसार गुन्हेगार असो की दुसरा कुठलाही माणूस असो त्याचं प्रेत कुटुंबाला देणे हे कर्तव्य आहे., दहशतवाद्याच्या कबरीला सजवण्याचा ठेका काँग्रेसने, महाविकास आघाडीने राष्ट्रवादीने घेतला आहे का?, असंही त्या म्हणाल्या आहेत.

 

Published on: Sep 08, 2022 12:53 PM
जेव्हा अजितदादा नाना पाटेकरांच्या घरी जातात, गप्पा-गोष्टी अन् बरंच काही… 
महाफास्ट 100: आजच्या सर्व महत्वाच्या बातम्या, पाहा एका क्लिकवर…