तुमच्या मनात जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत श्वास चालू राहणार, अपघातानंतर धनंजय मुंडे यांचं पहिलं भाषण

| Updated on: Feb 13, 2023 | 10:37 AM

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी अपघातानंतर बीडमध्ये काल पहिल्यांदाच जाहीर भाषण केलं. यावेळी बोलताना त्यांनी परळीच्या जनतेचे आभार मानले. पाहा संपूर्ण भाषण...

परळी, बीड : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी अपघातानंतर बीडमध्ये काल पहिल्यांदाच जाहीर भाषण केलं. यावेळी बोलताना त्यांनी परळीच्या जनतेचे आभार मानले. “आज ज्या पद्धतीने माझं स्वागत झालं. या स्वागताच काय वर्णन करू? शब्द कमी पडतील.तुम्ही सगळ्यांनी माझं राजकीय, सामाजिक काम पाहिलं आहे. तुमच्या मनात जोपर्यंत मी आहे तोपर्यंत श्वास चालू राहणार आहे”, असं धनंजय मुंडे म्हणाले. मी मंत्री असलो काय आणि नसलो काय तरी काही फरक पडत नाही. मात्र मी तुमच्यात पाहिले ते प्रेम जगात कुठे मिळू शकत नाही, असंही धनंजय मुंडे म्हणालेत. वक्तने थोडा साथ नहीं दिया तो लोग मेरे काबिलियत पर शक करने लगे है! संकट कुठलीही येऊ द्या. मी घाबरणार नाही, असा निर्धारही मुंडेंनी बोलून दाखवला.

Published on: Feb 13, 2023 10:29 AM
गुवाहाटी आणि सुरतला शिंदेगटाची शाखा काढायला गेला होता का? सुषमा अंधारे यांचा सवाल
आदित्य ठाकरे यांनी सांगितलं मुख्यमंत्री कुठे बोलतात आणि कुठे नाही याचे कारण