‘त्यांच्याकडे खूप जावई शोध धन्य आहे…’, राष्ट्रवादीचे मंत्री ‘या’ कारणावरून जितेंद्र आव्हाड यांच्यावर संतापले
मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मंत्री उदय सामंत हे छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे आणण्यासाठी ब्रिटनला गेलेत. वाघनखांवरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केलीय. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे जावई शोध खूप असतात. त्यांची धन्य आहे, असा टोला त्यांनी लगावला.
मुंबई : 3 ऑक्टोबर 2023 | राज्य मंत्रिमंडळात कुणीही नाराज नाही. कोण नाराज आहे ते तुम्हीच शोधून काढा. काही जण तशी अफवा पसरवत आहेत. कॅबिनेटपूर्वी प्री कॅबिनेट नेहमीच होत असते. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आजारी आहेत. त्यामुळे ते मंत्री मंडळाच्या बैठकीला आले नाहीत. आम्ही त्यांना भेटण्याचा प्रयत्न करु, असे राष्ट्रवादीचे मंत्री अनिल पाटील यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री पद कुणाला द्यायचे हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकारातील आहे. जेव्हा ते ठरवतील तेव्हा त्याचा निर्णय होईल. तिन्ही पक्षाचे नेते मिळून हा तिढा सोडवतील असेही त्यांनी सांगितले. नांदेडच्या घटनेची माहिती घेण्यासाठी कॅबिनेट बैठक सोडून मुश्रीफ साहेबांना तिथे पाठवलं आहे. तथ्य परिस्थिती पाहून निश्चित कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
Published on: Oct 03, 2023 09:53 PM