सध्या महाराष्ट्रात खालच्या पातळीचे राजकारण; संदीप क्षीरसागर यांची भाजपवर टीका

| Updated on: Jan 11, 2023 | 5:58 PM

मुश्रीफ यांच्यावर होत असलेल्या कारवाईविरोधात कोल्हापूरच्या कागलमध्ये मोठा राडा झाला. तेथे बंदची हाक देण्यात आली. तर ही कारवाई राजकीय सुडबुद्धीने केली जात असल्याची टीका राष्ट्रवादीने केली आहे

Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपचे नेते, माजी खासदार किरट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यानंतर आज त्यांच्या घरासह इतर तीन एक ठिकाणी ईडीने छापे टाकले. त्यावरून कोल्हापूरसह राज्यात राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. शिंदे-भाजप सरकारविरोधात टीकेची झोड उठलेली आहे.

मुश्रीफ यांच्यावर होत असलेल्या कारवाईविरोधात कोल्हापूरच्या कागलमध्ये मोठा राडा झाला. तेथे बंदची हाक देण्यात आली. तर ही कारवाई राजकीय सुडबुद्धीने केली जात असल्याची टीका राष्ट्रवादीने केली आहे. यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सुद्धा ईडीने केलेल्या या कारवाईचा निषेध करत टीका केली आहे. ते धनंजय मुंडे यांची प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ब्रिच कँडी रुग्णालयात गेले होते.

क्षीरसागर यांनी मुश्रीफ यांच्यावर झालेल्या कारवाई वर बोलताना, सध्या महाराष्ट्रात खालच्या पातळीचे राजकारण झाल्याच्या आरोप भाजपवर केला आहे. त्याचबरोबर आमदारांनी पक्ष बदल्यानंतर क्लीनचिट कशी मिळते असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट करण्याचं षडयंत्र चालू असल्याचं त्यांनी म्हटल आहे.