NCP Minister Meet Sharad Pawar: मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बंडखोर नेत्यांनी घेतली शरद पवार यांची भेट

| Updated on: Jul 16, 2023 | 2:17 PM

राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे सर्व बंडखोर मंत्र्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

मुंबई, 16 जुलै 2016 : राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे सर्व बंडखोर मंत्र्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अधिवेशनाच्या एक दिवस आधीच राष्ट्रवाचे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला आले होते. शरद पवार हे मंत्रालयासमोरीलच यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आहेत. तिथेच हे मंत्री पवारांना भेटायला गेले आहेत.दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील चव्हाण सेंटरकडे उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड देखील तातडीने चव्हाण सेंटरमध्ये पोहोचले.

Published on: Jul 16, 2023 02:16 PM
‘पावसाळी अधिवेशनात सरकारला खिंडीत आडविण्यासाठी अनेक मुद्दे’; अंबादास दानवे यांचा इशारा
‘भ्रष्टाचाराचा खालपासून वरपर्यंत कळस’; काँग्रेस नेत्याची सरकारवर टीकास्त्र