संजय शिरसाट, मुंबईत 72 व्या मजल्यावर कुणासाठी फ्लॅट घेतला?; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा सवाल
Sanjay Shirsat : जर न्यायालयातही न्याय मिळाला नाही तर शिरसाटांचं थोबाड रंगवू, धमकी समजा किंवा इशारा!, असं म्हणत शिरसाट यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या महिला नेत्या आक्रमक झाल्या आहेत. पाहा...
पुणे : शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत सुषमा अंधारे यांनी तक्रार दाखल केली आहे. या सगळ्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुंबईत 72 व्या मजल्यावर कुणासाठी फ्लॅट घेतला आहे?, असा सवाल रूपाली पाटील यांनी विचारला आहे. संजय शिरसाटांच्या विरोधात आम्ही न्यायालयात तक्रार दाखल करणार आहोत. त्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे. पण जर आम्हाला न्यायालयातही न्याय मिळाला नाही तर आम्ही त्यांचं थोबाड रंगवू. नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू, ही धमकी समजा किंवा इशारा समजा, असं रूपाली पाटील म्हणाल्या आहेत. त्या पुण्यात टीव्ही ९ मराठीशी बोलत होत्या.
Published on: Mar 28, 2023 12:49 PM