राहुल गांधी यांच्या पंतप्रधान मोदी यांच्यावरील ‘त्या’ टीकेला भाजप नेत्याचं तिखट उत्तर; ”ज्याचं लग्न झालं नाही”

| Updated on: Jun 06, 2023 | 7:57 AM

राहुल गांधी यांनी, राज्याभिषेक पूर्ण झाला 'अहंकारी राजा' रस्त्यावर जनतेचा आवाज चिरडत आहे अशी टीका काही दिवसांपुर्वी केली होती. यावर आता भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेससह विरोधकांकडून टीका केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निशाना केला जात आहे. यावरून राहुल गांधी यांनी, राज्याभिषेक पूर्ण झाला ‘अहंकारी राजा’ रस्त्यावर जनतेचा आवाज चिरडत आहे अशी टीका काही दिवसांपुर्वी केली होती. यावर आता भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना, राहुल गांधी याचा कधी राज्याभिषेक होऊ शकत नाही, असं म्हटलं आहे. तर ज्यांचे लग्न झाले नाही त्याचा राज्यभिषेक तरी कसा होईल असा खोटक सवाल केला आहे. त्याचबरोबर भाजप सरकारने नवीन संसद भवनाची जी इमारत बांधली याचे साधं अभिनंदन यांना करता येत नाही असेही टीका त्यांनी केली आहे.

Published on: Jun 06, 2023 07:57 AM
“संजय राऊत यांची मानसिकता संपली, त्यांचं डोकं ठिकाणावर नाही”, नारायण राणे यांचं टीकास्त्र
अमित शाहांसमोर 3 गोष्टींवर ठरलं! मिशन लोकसभेला फायदा होईल असे मंत्री होणार?