25 Fast News | जुन्या पेन्शनबाबतचा मुद्दा चिघळला, सरकारबरोबरच्या बैठकीमध्ये कोणताही तोडगा नाही

| Updated on: Mar 14, 2023 | 8:49 AM

आज रात्री बारा वाजल्यापासून संपावर जाण्याचा निर्णय कर्मचारी संघटनांनी घेतला आहे

मुंबई : राज्यातील शासकीय, निमशासकी, शिक्षक आणि शिक्षेत्तर कर्मचारी यांनी जुन्या पेन्शनसाठी यल्गार पुकारला आहे. त्याबाबत संपाचे अस्त्र काढले आहे. पण असे न करता तोडगा काढू असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे काल बैठक देखील पार पडली. मात्र या बैठकीत कोणताच तोडगा न निघाल्याने जुन्या पेन्शनचा प्रश्न आणखी चिघळला. त्यानंतर आज रात्री बारा वाजल्यापासून संपावर जाण्याचा निर्णय कर्मचारी संघटनांनी घेतला आहे. तर या संपात सरकारी कर्मचाऱ्यांनी सहभागी झाल्यास शिस्तभंग कारवाई होईल अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमित भांगे यांनी दिली. उद्धव ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे यांची कामाची पद्धत आवडल्याने शिवसेनेत प्रवेश केल्याची भूषण देसाई यांनी म्हटलं आहे.

Published on: Mar 14, 2023 08:49 AM
ईडीच्या कारवाईचा ससेमिरा; अनिल परब यांची उच्च न्यायालयात धाव
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिलाच पाहिजे पण…; ठाकरेगटाच्या नेत्याची मागणी