मिटकरी यांच्या टीकेनंतर नितेश राणे यांचा पलटवार; म्हणाले, “हिंमत असेल तर…”
"19 फेब्रुवारीला शिवजयंती घेण्याबाबत उद्धव ठाकरे यांना सांगून दाखवा", असं आव्हान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना केलं आहे. अमोल मिटकरी यांच्या टीकेनंतर नितेश राणे यांनी पलटवार केला आहे.
सिंधुदुर्ग : “19 फेब्रुवारीला शिवजयंती घेण्याबाबत उद्धव ठाकरे यांना सांगून दाखवा”, असं आव्हान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना केलं आहे. अमोल मिटकरी यांच्या टीकेनंतर नितेश राणे यांनी पलटवार केला आहे. “अमोल मिटकरी लहान माणूस आहे, तसं ते चेक शिवाय बोलत नाही, माझा अनुभव आहे तो, पण त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी 19 फेब्रुवारीला शिवजयंती घेण्याबाबत उद्धव ठाकरे यांना सांगून दाखवावं. आमच्याकडे येण्यापेक्षा त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे जावं. मग पुढचा चेक त्यांना माझ्या नावाने”, असं नितेश राणे म्हणाले. नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. “बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीवेळी देखील आदित्य ठाकरे लंडनला होते, ही लोकं महापुरुषांचा वापर फक्त राजकारणासाठी करतात”, असं नितेश राणे म्हणाले.