“सूरज चव्हाण यांचा सुशांत सिंह, मनसुख हिरेन होणार नाही याची काळजी घ्या”, नितेश राणे यांचा खळबळजनक दावा
भाजप नेते नितेश राणे यांनी सुरज चव्हाण यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. सूरज चव्हाण यांचा सुशांत सिंह, मनसुख हिरेन होणार नाही याची काळजी घ्या असं म्हणत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
सिंधुदुर्ग : भाजप नेते नितेश राणे यांनी सुरज चव्हाण यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. सूरज चव्हाण यांचा सुशांत सिंह, मनसुख हिरेन होणार नाही याची काळजी घ्या असं म्हणत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “आदित्य ठाकरे स्वतः सूरज चव्हाणला भेटायला गेले. दिशा सालियानच्या हत्येनंतर काही लोक सुशांत सिंहला भेटायला गेले होते. भेट झाल्यानंतर काही दिवसातच सुशांत सिंहची हत्या झाली. असेच काही सूरज चव्हाण बाबत घडणार नाही ना? सूरज चव्हाणचा मनसुख किंवा सुशांत सिंह होणार नाही ना, याची काळजी मुंबई पोलिसांनी आणि संबंधित डिपार्टमेंटने घेतली पाहिजे.उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांचा इतिहास आहे जे जे त्यांना आडवे आले त्यांना त्यांना त्यांनी संपवले आहे,” असं नितेश राणे म्हणाले.
Published on: Jun 26, 2023 04:37 PM