“बायकोच्या भरोशावर राजकारण करणाऱ्याने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करू नये”, ठाकरे गटाची टीका
उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर आमदार रवी राणा यांनी टीका होती. नामर्द मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची ओळख तेव्हा निर्माण झाली. मुख्यमंत्री असताना त्यांनी सत्तेचा दुरुपयोग केला, असं रवी राणा म्हणाले. रवी राणा यांच्या या टीकेला ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अमरावती : गेले दोन दिवस ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विदर्भाच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या या दौऱ्यावर आमदार रवी राणा यांनी टीका केली. नामर्द मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची ओळख तेव्हा निर्माण झाली. मुख्यमंत्री असताना त्यांनी सत्तेचा दुरुपयोग केला, असं रवी राणा म्हणाले. रवी राणा यांच्या या टीकेला ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “रवी राणा कोण याला नवनीत राणाचा नवरा अशी त्याची ओळख आहे. चिंच दाखवून तरुणांची मतं घेतली. येणारी निवडणुकीत मराठी माणूस त्यांची औखात दाखविलं.बायकोच्या भरोशावर राजकारण करणाऱ्यानं टीका करू नये. निवडणुकीत उत्तर दाखवू. उद्धव ठाकरे यांचे बॅनर फाडणाऱ्याचा शोध घेतला जाईल,” असं नितीन देशमुख म्हणाले.
Published on: Jul 11, 2023 07:43 AM