नाशिकमध्ये भोंगे खरेदी प्रकरणी 200 मनसैनिकांना नोटीस

| Updated on: May 01, 2022 | 10:02 AM

नाशिकमध्ये भोंगे खरेदी प्रकरणात 200 मनसे सैनिकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. जर सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर कारवाई करण्यात येईल, असा इशारा या नोटीसीच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

आज राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. यापूर्वी मुंबई आणि ठाण्यात झालेल्या सभेत त्यांनी मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच मशिदीवरील भोंगे उतरवले गेले नाहीत तर आम्ही देखील भोंग्यावर हनुमान चालीसा म्हणून असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. भोंगे उतरवण्यासाठी मनसेकडून तीन मे रोजीचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राजकारण चांगलेच तापले असून, नाशिक मध्ये भोंगे खरेदी प्रकरणात 200 मनसैनिकांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. तसेच सामाजिक शांततेचा भंग केल्यास कारवाई करू असा इशारा देखील देण्यात आला आहे.

Published on: May 01, 2022 10:02 AM
राज ठाकरे यांच्या सभेची मनसेकडून जय्यत तयारी
आक्रमकता ही कृतीतून दिसावी लागते, संदीप देशपांडेंचा शिवसेनेला टोला