माघी गणेशोत्सवानिमित्त बल्लाळेश्वर मंदिर विद्युत रोषणाईने उजळले

| Updated on: Feb 04, 2022 | 11:38 AM

महाराष्ट्रातील (Maharashtra) प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या पाली बल्लाळेश्वर (Ballaleshwar) देवस्थानचा माघी महोत्सव म्हणजे भक्तिमय व धार्मिक पर्वणीच. पण मागील दोन वर्षे हा उत्सव साधेपणा जपत साजरा करावा लागतोय.

महाराष्ट्रातील (Maharashtra) प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या पाली बल्लाळेश्वर (Ballaleshwar) देवस्थानचा माघी महोत्सव म्हणजे भक्तिमय व धार्मिक पर्वणीच. पण मागील दोन वर्षे हा उत्सव साधेपणा जपत साजरा करावा लागतोय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही बल्लाळेश्वराचा माघी गणेशोत्सव कोरोनाचे (Corona) नियम पाळून होतोय. याबरोबरच यात्रा आणि काही उपक्रम होणार नाहीत. त्यामुळे अनेक भक्तांचा हिरमोड झालाय. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर व मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. हजारो जण मंदिराचा हा रोषणाई केलेला फोटो आपल्या स्टेटसवर व सोशल मीडियावर ठेवत आहेत. आणि गणेशोत्सवाची ओढ लागली असल्याचे सांगत आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा आणि धार्मिक उत्सव साजरे करण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. परिणामी उत्सवात यावर्षी यात्रेसाठी अथवा रस्त्यावर दुकाने लावण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी नाही. त्याचप्रमाणे जन्म सोहळ्याच्या कीर्तनास व इतर किर्तनास फक्त 50 जण उपस्थित राहतील. यावर्षी श्री गणेशाची पालखी देखील कोणताही गाजावाजा न करता साधेपणाने गाडीतून निघेल. तसेच पालखी रस्त्यात कोठेही थांबणार नसून लोकांनी पालखीस न ओवाळता फक्त नमस्कार करावे. तसेच भाविकांसाठी महाप्रसाद यावर्षी होणार नाही. मासोत्सवातील सर्व कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण केबल टीव्हीवर व फेसबुक लाईव्हवर दाखविण्यात येणार आहे. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष ऍड. धनंजय धारप यांनी दिली.

Published on: Feb 04, 2022 11:38 AM
अनावधानाने बोललो, सर्वांची माफी मागतो; बंडातात्या कराडकरांची जाहीर दिलगीरी
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 4 February 2022