अजित पवार यांच्या भाजप प्रवेशावर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची ‘ही’ अट; पहा काय म्हणाले…

| Updated on: Apr 17, 2023 | 1:59 PM

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार आशिष शेलार हे थेट दिल्लीला गेल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तर त्यांची दिल्ली वारी ही अजित पवार यांच्यानिमित्ताने असल्याचे बोलले जात आहे

नवी दिल्ली : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर तर पुण्यासह पुरंदरचा दौरा रद्द झाल्याने भाजप प्रवेशाच्या चर्चांना उत आला आहे. तर काल नागपूर येथे पार पडलेल्या मविआच्या वज्रमूठ सभेतही त्यांचे भाषण झालेले नाही. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार आशिष शेलार हे थेट दिल्लीला गेल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तर त्यांची दिल्ली वारी ही अजित पवार यांच्यानिमित्ताने असल्याचे बोलले जात आहे. यादरम्यान सुरू असणाऱ्या चर्चांवर बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेचा हा दौरा राजकीय नसून प्रशासकीय असल्याचे सांगत याचा अजित पवार यांच्याशी काही संबंध नसल्याचेही ते म्हणालेत. तर देव, देश आणि धर्म ही आमची काम करण्याची पद्धत असून या आधारावरच काम करावं लागतं. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा संकल्प आम्हाला पूर्ण करावा लागतो. त्यामुळे आमच्या विचारधारेशी सहमत असाल, तर आमचा विरोध नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Apr 17, 2023 01:54 PM
‘मविआ’च्या वज्रमूठ सभेचं मैदान पवित्र, कुणी गोमूत्र शिंपडून केलं शुद्धीकरण
येत्या निवडणुकीत संभाजीराजेंशी हात मिळवणी करण्यासाठी ‘हा’ पक्ष तयार?; पाहा व्हीडिओ…