‘खंडोजी खोपडे आणि सुर्याजी पिसाळ यांना लक्षात ठेवत नाहीत’; अंबादास दावने यांचा कोणावर निशाना

| Updated on: Aug 27, 2023 | 2:39 PM

उद्धव ठाकरे यांची मराठवाड्यातील हिंगोलीत पहिली सभा होत आहे. त्यासाठी ठाकरे गटातील अनेक नेते हिंगोलीत गेले आहेत. तर ठाकरे यांच्या या सभेवरून शिंदे गटातील नेते टीका करताना दिसत आहेत.

हिंगोली : 27 ऑगस्ट 2023 | ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. तर त्यांची हिंगोलीतील रामलीला मैदानावर जाहीर सभा होत आहे. यावरून शिंदे गटातील हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी जोरदार टीका केलेली आहे. यावेळी त्यांनी ठाकरे यांना टोला लगावताना, त्यांनी एक दिवसा आड सभा जरी घेतल्या तरी येथे काही फरक पडणार नाही असे बांगर यांनी म्हटलं आहे. त्यावरून आता ठाकरे गटातील नेत्यानी समाचार घेणं सुरू केलं आहे.

ठाकरे गटाचे नेते तथा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी बांगर यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी बांगर यांचे नाव न घेता टीका केली. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी घडवलेले लोकांनीच गद्दारी केली. यांना जनता लक्षात ठेवेल. तर ठाकरे सांगतील त्यांला जनता निवडून देइल. त्यामुळे हे कोण व्यक्ती आहेत त्यांची नावं काय हे देकील आता लक्षात ठेवण्याची गरज नाही.

हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे. येथे लोक ज्याने निष्ठा ठेवली, पराक्रम केला त्यालाच लक्षात ठेवतात, मग ते बाजीप्रभू असतील किंवा येसाजी कंक. पण लोक खंडोजी खोपडे आणि सुर्याजी पिसाळ यांना लक्षात ठेवत नाहीत.

Published on: Aug 27, 2023 02:39 PM
‘उध्दव ठाकरे यांनी आधी त्यांच्या आजूबाजच्या रावणांचे दहन करावे’; बांगर यांच्याकडून राऊत यांचा ‘रावण’ असा उल्लेख
‘त्याचं लवकरचं विसर्जण होईल’; ठाकरे गटातील खासदाराची बांगर यांच्यावर जोरदार टीका