भाजपच्या 45 मिशनवर शिवसेना नेत्याची सडकून टीका, म्हणाले, ‘भाजपचं डोकं… 4 आणि 5 जागा ’
त्याचदृष्टीकोणातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यातील एनडीएच्या खासदारांची बैठक बोलावली आहे. तर भाजपकडून लोकसभेसाठी मिशन ४५ चा नारा देण्यात आला आहे.
मुंबई, 10 ऑगस्ट 2023 । आगामी लोकसभेच्या निवडणुकसाठी भाजपने पुर्ण तयारी केली आहे. त्याचदृष्टीकोणातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यातील एनडीएच्या खासदारांची बैठक बोलावली आहे. तर भाजपकडून लोकसभेसाठी मिशन ४५ चा नारा देण्यात आला आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी थेट भाजला खोचक टोला लगावला आहे. यावेळी दानवे यांनी, भाजप ४५ नाही तर ५४ देखील म्हणतील. भाजपचं डोकं फिरलं आहे. ४५ त्यांची जहागीरी आहे का? सर्व्हे बाहेर येत आहेत. महाराष्ट्राची जनता भाजपला ४ ते ५ जिंकून देईल, असे दानवे म्हणालेत.
Published on: Aug 10, 2023 02:49 PM