Palgahr | पालघरच्या शिक्षणाधिकाऱ्याला लाच घेताना अटक

| Updated on: Apr 26, 2022 | 9:45 AM

पालघरच्या शिक्षणाधिकारी लता सानप यांना 25 हजाराची लाच स्विकारताना रंगेहात पकडलं आहे. पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या वादग्रस्त उर्मट शिक्षणाधिकारी आहेत अशी माहिती मिळत आहे.

पालघरच्या शिक्षणाधिकारी लता सानप यांना 25 हजाराची लाच स्विकारताना रंगेहात पकडलं आहे. पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या वादग्रस्त उर्मट शिक्षणाधिकारी आहेत अशी माहिती मिळत आहे. एका शिक्षिकेकडून बदलीसाठी 25 हजाराची लाच मागितली होती. आपल्या घरात 25 हजाराची लाच स्वीकारताना पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले आहे. आता त्यांच्यावर काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे त्यांची कसून चौकशी करण्यात येणार असून आणखी काही प्रकरणं उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

Sadabhau Khot On Amol Mitkari | अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या फडातील नाचा- सदाभाऊ खोत
Ulhasnagar Bike fire | तापमानात वाढ झाल्याने दुचाकीला भररस्त्यात आग