Parbhani hit and run : वृद्ध महिलेला भरधाव वाहनानं चिरडलं! कार चालकाला पाठलाग करुन पोलिसांनी पकडलं
यात 65 वर्षांच्या जिजाबाई लांडगे यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं राज्यातील रस्ते अपघातांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा लक्ष वेधलं आहे.
परभणी : परभणीमध्ये एका महिलेचा कार अपघातात मृत्यू झाला. एका भरधाव वाहनांनं वृद्ध महिलेला धडक दिली. या धडकेत महिला जागीच ठार झाली. त्यानंतर कारचालकानं पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी थरारक पाठलाग करत कार चालकाला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखळ करुन कार चालकाविरोधात कारवाई केली आहे. परभणीच्या सेलू तालुक्यातील मोरेगाव-देहगाव रस्त्यावर हा अपघात झाला. यात 65 वर्षांच्या जिजाबाई लांडगे यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं राज्यातील रस्ते अपघातांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा लक्ष वेधलं आहे.