शेतमालाला भाव मिळत नाही! मग आता गावचं इकायचं
नाशिकच्या देवळा तालुक्यातील फुलेमालवाडी गावचं गावकऱ्यांनी विकायला काढलं आहे. याबाबत गावकऱ्यांनी ठराव करून तो शासनाकडे पाठवणार आहेत
नाशिक : कितीही चांगली शेती करा, राबा, चांगलं पिक आना पण जर त्या मालालाच भाव मिळत नसेल तर शेतकऱ्यानं करायचं तरी काय? शासन दरबारी किती हाका मारायच्या? पण ऐकतो तरी कोण? त्यामुळं हवालदिल झालेल्या गावकऱ्यांनी चक्क गावचं विकायला काढलं. त्यामुळे राज्यातील जनतेसह सरकारी अधिकारीही बुचकाळ्यात पडले आहेत. नाशिकच्या देवळा तालुक्यातील फुलेमालवाडी गावचं गावकऱ्यांनी विकायला काढलं आहे. याबाबत गावकऱ्यांनी ठराव करून तो शासनाकडे पाठवणार आहेत. त्याच्या आधी आज गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. गावच्या या निर्णयामुळे शासकीय यंत्रणेसह लोकप्रतिनिधींची मोठी अडचण झाली आहे. याच्याआधी गावचा विकास होत नसल्याने राज्यातील अनेक गावांनी कर्नाटक आणि गुजरातमध्ये जाण्यास परवानगी द्या असे ठराव केले होते. त्यानंतर आता फुलेमाळवाडी विकण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतल्याने फुलेमाळवाडी गाव चर्चेत आले आहे.