रेशनवर प्लास्टीक तांदुळ? खासदार प्रणिती शिंदे यांचा आरोप, काय प्रकरण ?

| Updated on: Sep 28, 2024 | 4:09 PM

राज्यातील रेशनिंगच्या दुकानातून प्लास्टीकचा तांदुळ वितरीत केला जात असल्याचा आरोप सोलापूरच्या कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. काय आहे नेमके प्रकरण पाहूयात....

Follow us on

कॉंग्रेसच्या सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी रेशनिंगवर प्लास्टीकचा तांदुळ वितरीत केला जात असल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांनी आढावा घेतला आहे. या संदर्भात रेशनिंग दुकानातील तांदळाची पाहणी केली असता अतिशय कमी प्रमाणत हा तांदुळ मिक्स केला जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्याने म्हटले आहे. हा तांदुळ प्लास्टीकचा नसून या फोर्टीफाईड तांदूळ म्हणतात. मूळ तांदूळाची भुकटी करुन त्यात कृत्रिमरित्या पोषक घटक घालून हा तांदूळ कारखान्यात तयार केला जातो. ज्या लोह, खनिज, फॉलिक एसिड असे पोषक घटक घातले जातात. गर्भाच्या पोषणासाठी हे फॉलिक एसिड अतिशय महत्वाचे असते असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याचे सुरवसे यांनी म्हटले आहे. शंभर किलोत एक किलो या प्रमाणात हा तांदूळ मिक्स केला जात असल्याचे म्हटले जात आहे.