“INDIA नव्हे तर घमंडिया…”; विरोधकांच्या आघाडीचं नामकरण करत पंतप्रधान मोदी यांची टीका
भाजपच्या संसदीय पक्षाची आज बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली आहे.
नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2023 | काही महिन्यांवर लोकसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांची या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. विरोधकांच्या आघाडीने इंडिया हे नवं ठेवलं आहे. नुकतीच या आघाडीची एक बैठकही पार पडली. मात्र विरोधकांच्या या इंडिया नावाच्या आघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला आहे. भाजपच्या संसदीय पक्षाची आज बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली आहे. “इंडिया नव्हे तर घमंडिया आघाडी,” अशी टीका मोदींनी केली. तसेच “अहंकाराला एकजुटीनं उत्तर द्या,” असं आवाहन मोदींनी आपल्या सहकाऱ्यांना केलं.
Published on: Aug 08, 2023 12:30 PM