शरद पवार अन् अजित पवार भेट हा खेळीचा भाग? प्रकाश आंबेडकर यांनी सांगितली क्रोनोलॉजी
रविवारी अजित पवार गटाने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. या भेटीमागची क्रोनोलॉजी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितली आहे.
मुंबई, 17 जुलै 2023 | रविवारी अजित पवार गटाने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे आणि आदिती तटकरे आदी नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. अधिवेशनाच्या एक दिवस आधीच राष्ट्रवाचे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला आल्याने अनेक तर्क-वितर्क काढले जात आहेत. या भेटीमागची क्रोनोलॉजी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितली आहे. ” पुन्हा भाजपचं सरकार आलं पाहिजे, अशा रितीनं अजितदादांची खेळी आहे. अजित पवार यांच्याकडून संभ्रम निर्माण करण्यात प्रयत्न केला जातोय. शरद पवार यांना भेटले हा देखील खेळीचा भाग मानतो,” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
Published on: Jul 17, 2023 10:02 AM