“मुख्यमंत्री मला दिलेला शब्द पाळतील”, मंत्रिमंडळ विस्तारावर प्रताप सरनाईक यांचं सूचक विधान

| Updated on: Jun 13, 2023 | 10:40 AM

लवकरच राज्यात शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे. अनेक इच्छुकांनी आपली मंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. अशात, शिवसेनेतील नेते प्रताप सरनाईक यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर सूचक विधान केलं आहे.

मुंबई : लवकरच राज्यात शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे. अनेक इच्छुकांनी आपली मंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. अशात, शिवसेनेतील नेते प्रताप सरनाईक यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर सूचक विधान केलं आहे. “एकनाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्याप्रकारे हे सरकार काम करत आहे. 24 तास काम करणारे मुख्यमंत्री, ठाणेकर म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव जगभर गाजतंय. जरी मंत्रिमंडळाचा विस्तार लाभला, तरी इतर मंत्र्यांमुळे राज्याच्या सुरळीत कारभार सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काहीही झालं तरी एखाद्याला दिलेला शब्द पाळण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे मला दिलेला शब्द ते नक्कीच पाळतील”, असं प्रताप सरनाईक म्हणाले. “तसेच लवकरच ते दिलेला शब्द पाळून मंत्रिमंडळ विस्तार करतील याबाबत आमच्या मनात काळजीचे कारण नाही”, असं वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलं आहे.

 

Published on: Jun 13, 2023 10:40 AM
VIDEO | धर्मांतरवरून भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेसवर मोठा आरोप? दिला कोणता इशारा?
ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत का आहे अश्वाची परंपरा ? नेमकं कारण काय?