Shivsena Vardhapan Din | शिवसेनेचा 56 वा वर्धापन दिनानिमित्त वेस्ट इन हॉटेलमध्ये तयारी सुरु

| Updated on: Jun 19, 2022 | 12:31 PM

 शिवसेनेचा (Shivsena) आज 56 वा वर्धापन दिन सोहळा आहे. शिवसेना पक्ष प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दुपारी 12 वाजता शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. हा सोहळा पवई येथील वेस्टिन हॉटेलच्या सभागृहात साजरा होणार आहे.

मुंबई : शिवसेनेचा (Shivsena) आज 56 वा वर्धापन दिन सोहळा आहे. शिवसेना पक्ष प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दुपारी 12 वाजता शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. हा सोहळा पवई येथील वेस्टिन हॉटेलच्या सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होईल. वर्धापना दिनानिमित्त शिवसैनिकांकडून वेस्टिन हॉटेलमध्ये वर्धापन दिन सोहळ्याची तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  दुपारी  12 वाजता वेस्टिन हॉटेलमध्ये पोहचणार आहेत. वेस्टिन हॉटेल मधून यातयारीचा आडावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय मंकनी यांनी. गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेच्या आमदारांना याच वेस्टिन हॉटेल मध्ये ठेवण्यात आलं होतं. याच हॉटेलमध्ये आता वर्धापन दिनाची तयारी सुरू आहे. फुलांची सजावट करण्यात आली आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याआमदारांशी काय बातचीत करणार. वर्धापन दिनानिमित्त त्यांना काय मार्गदर्शन देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Published on: Jun 19, 2022 12:31 PM
VIDEO : Buldana Flood Water in Shop | पहिल्याच पावसात चिखली नगरपरिषदेची लक्तरं वेशीवर, दुकानात घुसले पाणी
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 12 PM | 19 June 2022