यंदाच्या पंढरीच्या वारीसाठी जय्यत तयारी
यंदा मोठ्या संख्येने वारकरी पंढरीच्या वारीत सहभागी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर तीन महिने आधीच तयारीला सुरुवात करण्यात आली असून, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडू पालखी मार्गाची पहाणी करण्यात आली आहे.
गेले दोन वर्ष देशासह राज्यावर कोरोना संकट होते. त्यामुळे अनेक निर्बंध घालण्यात आले. दरम्यान या काळात पंढरीची पायी वारी देखील होऊ शकली नाही. मात्र यंदा मोठ्या संख्येने वारकरी पंढरीच्या वारी सोहळ्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर तीन महिने आधीच तयारीला सुरुवात केली असून, त्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पालखी मार्गाची पहाणी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली आहे.
Published on: May 25, 2022 08:01 PM