Pune Corona | पुण्यात आज कोरोना आढावा बैठक, अजित पवार उपस्थित राहणार

| Updated on: Jun 25, 2021 | 8:40 AM

आज पुण्यात कोरोना आढावा बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. यावेळी पुण्यातील कोरोना रुग्ण, कोरोना निर्बंध, अनलॉक यांसह विविध गोष्टींवर चर्चा केली जाणार आहे. 

पुणे : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन शिथील करण्यात आला आहे. मुंबईसह पुण्यातही कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात कोरोना आढावा बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. यावेळी पुण्यातील कोरोना रुग्ण, कोरोना निर्बंध, अनलॉक यांसह विविध गोष्टींवर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीला अजित पवारांसोबतच पुण्यातील इतर महत्त्वाचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर पुण्यातील निर्बंधांबद्दल चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.

गुलाबराव पाटील मला वडिलांसारखे, त्यांनी टीका न करता प्रोत्साहन द्यायला हवे, रक्षा खडसेंचा खोचक टोला
पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात : सामना