पुणे : कसबा पोटनिवडणुकीसंदर्भातील मोठी बातमी… कसबा पोटनिवडणुकीतील काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपने निवडणुकीदरम्यान पैसे वाटल्याचा आरोप करत रविंद्र धंगेकर यांनी उपोषण केलं होतं. हे उपोषण आचारसंहितेचा भंग करत करण्यात आल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या शिवाय राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपाली पाटील यांनी गोपनियतेचा भंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत रासने मतदान केंद्रात जाताना भाजपचं उपरणं घालून गेल्याने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. अन् रासने यांच्या विरोधात या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे.