मुख्यमंत्रिपदाचा सन्मान वाढवायचा असेल तर ‘ही’ एक गोष्ट करा; सुषमा अंधारे यांचा एकनाथ शिंदे यांना सल्ला

| Updated on: Apr 04, 2023 | 3:23 PM

Sushma Andhare on CM Eknath Shinde : सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्ला दिलाय. तसंच देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी टीका केलीय. पाहा त्या काय म्हणाल्यात...

पुणे : शिवसेना ठाकरेगटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्ला दिलाय. जर तुम्हाला मुख्यमंत्रिपदाचा सन्मान वाढवायचा असेल तर एका गटाचे नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा. लोकहिताचे निर्णय घ्या, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही माझी विनंती असेल की आपल्याकडे कामाचा ताण जास्त झाला असेल तर गृहखात्याची जबाबदारी दुसऱ्या कुणाकडे तरी द्या. कारण राज्यात रोज नव्या घटना घडत आहेत. त्याकेड कुणीही गांभीर्याने पाहत नाहीये, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. त्या पुण्यात टीव्ही 9 मराठीशी बोलत होत्या.

Published on: Apr 04, 2023 03:20 PM
सोलापुरच्या उजनी धरणाच्या कुशीत स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग
वाढत्या कोरोनाच्या फैलावामुळे ‘या’ जिल्ह्यात पुन्हा मास्कसक्ती