“राहुल गांधींना पुणे कोर्टात हजर राहावंच लागेल, जी शिक्षा होईल ती त्यांनी भोगावी”

| Updated on: Apr 13, 2023 | 12:31 PM

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात पुणे सत्र न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. पाहा व्हीडिओ...

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात दावा दाखल केला आहे. पुणे सत्र न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी 15 तारखेला सुनावणी होणार आहे. याबाबत सात्यकी सावरकर यांच्याशी आम्ही बातचित केली. तेव्हा “राहुल गांधींना पुणे कोर्टात हजर राहावं लागेल. आम्ही राहुल गांधींवर मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यांच्या वक्तव्यानं सावरकर कुटुंबात संताप आणि द्वेषाची भावना आहे. राहुल गांधींना विशिष्ट वर्गाची मतं हवी आहेत म्हणून ते अशी वक्तव्य करतायेत”, असं सात्यकी सावरकर यांनी म्हटलं आहे. आम्हाला न्यायालयात जाण्याची वेळ आली. कोर्ट जी शिक्षा देईल ती त्यांनी भोगावी.या आधी चौकीदार चोर है या प्रकरणात राहुल गांधींनी माफी मागितली आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला काही अर्थ नाही, असंही सात्यकी सावरकर म्हणाले आहेत.

Published on: Apr 13, 2023 12:31 PM