पुण्यात पीएमपीएमएल बसमधून महिलांना मोफत प्रवास; जागतिक महिला दिनानिमित्त खास उपक्रम

| Updated on: Mar 08, 2023 | 9:47 AM

तेजस्विनी बसमध्ये वाहक आणि चालकांकडून आजच्या दिवशी गुलाब देत महिलांचं स्वागत केलं जात आहे.

पुणे : आज जागतिक महिला दिन आहे. त्यानिमित्त विविध उपक्रम राबवले जात आहेत. पुण्यात आज महिलांना पीएमपीएलमधून मोफत प्रवास दिला जात आहे. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत पीएमपीएल प्रशासनाचा निर्णय हा निर्णय घेतला आहे. आजपासून दर महिन्याचा आठ तारखेला महिलांसाठी पीएमपीचा प्रवास मोफत असणार आहे. तेजस्विनी बसमध्ये दर महिन्याच्या आठ तारखेला दिवसभर मोफत प्रवास करता येणार आहे. आजपासून मोफत बससेवाला सुरुवात करण्यात आली आहे. जास्तीत जास्त महिलांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असं आवाहन पीएमपीएमच्या वतीने करण्यात आलं आहे.

Published on: Mar 08, 2023 09:46 AM
पहिला अभिमान वाटला पाहिजे आपण भारतीय आहोत – अजित पवार
पुणे जिल्ह्यात शिवभोजन थाळी योजनेचा बोजवारा, नेमकं काय कारण?