पंचगंगेनं कोल्हापूरकरांची धाकधूक वाढवली; राधानगरी धरणही भरलं, पाणी पातळी 40 फूट 5 इंचावर

| Updated on: Jul 26, 2023 | 10:25 AM

मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी सतत वाढ होत असून सध्या पाणी पातळी 40 फूट 5 इंचावर आहे. त्यामुळे प्रशासन आलर्ट मोडवर आले आहे. याचदरम्यान धरण क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण देखील 100 टक्के भरलं आहे.

कोल्हापूर, 26 जुलै 2023 | कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीला पूर आला आहे. मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी सतत वाढ होत असून सध्या पाणी पातळी 40 फूट 5 इंचावर आहे. त्यामुळे प्रशासन आलर्ट मोडवर आले आहे. याचदरम्यान धरण क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण देखील 100 टक्के भरलं आहे. जोरदार पाऊसामुळे राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडलाय. सहा नंबरचा स्वयंचलित दरवाजा हा उघडला असून त्यातून पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू करण्यात आलाय. सध्या पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असून तिची वाटचाल ही धोका पातळीकडे होत आहे. पंचगंगेची इशारा पातळी 39 फुटांवर असून धोका पातळी 43 फुटांवर आहे. त्यामुळं कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं नदीकडच्या गावांना सतर्क राहून स्थलांतर करण्याचे आदेश दिलेत.

Published on: Jul 26, 2023 10:24 AM
रडगाण्या ऐवजी सनईचे सूर, स्मशानभूमीत पार पडला विवाहसोहळा; नेमकं प्रकरण काय? पाहा व्हिडीओ
इर्शाळवाडी दुर्घटनेवरून उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; म्हणाले, ‘कसला अमृत महोत्सव साजरा करतोय?’