Raj Thackeray Aurangabad Sabha Live | ‘गडबड केली तर तिथंच हाणा,चौरंगा करुन घरी पाठवील’
ही मनसेची सभा आहे. इथे काही गडबड कराल तर चौरंग करुन घरी पाठवीन, अशा शब्दात राज यांनी गोंधळ घालणाऱ्यांना आणि एकप्रकारे सभा उधळून लावण्याचा इशारा देणाऱ्या संघटनांना थेट इशारा दिला.
औरंगाबाद : औरंगाबाद पोलिसांनी 15 हजाराची मर्यादा घालून दिली असताना सभेला प्रत्यक्षात एक लाखापेक्षा अधिक मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्याचवेळी सभेत काही गडबड सुरु झाल्याचं राज ठाकरे यांच्या लक्षात आलं. त्यावेळी राज ठाकरे यांनी गोंधळ घालणाऱ्यांना थेट इशारा दिला. काही टाळकी गडबड करायला आली असतील तर तिथल्या तिथे हाणा. ही मनसेची सभा आहे. इथे काही गडबड कराल तर चौरंग करुन घरी पाठवीन, अशा शब्दात राज यांनी गोंधळ घालणाऱ्यांना आणि एकप्रकारे सभा उधळून लावण्याचा इशारा देणाऱ्या संघटनांना थेट इशारा दिला.