Gudhi Padwa 2023 : राज ठाकरे यांची आज जाहीर सभा; काय बोलणार? राजू पाटील यांनी महत्वाचे मुद्दे सांगितले…

| Updated on: Mar 22, 2023 | 7:49 AM

आज गुढी पाडव्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. या सभेत ते काय बोलणार यावर आमदार राजू पाटील भाष्य केलं आहे. पाहा...

मुंबई : आज गुढीपाडवा आहे. त्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. या सभेत ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी राज ठाकरेंच्या सभेतील महत्वाच्या मुद्यांवर प्रकाश टाकला आहे. “राज साहेब काय बोलणार हे आम्हलाही माहिती नाही. गेल्या दिवसाआधी भोग्यांबाबत मनसेने भूमिका घेतली होती. मात्र पुन्हा हे भोंगे पुन्हा सुरू झाले आहेत.त्यामुळे त्यावर राजसाहेब काय भूमिका घेतली हे तेच सांगतील. राज्यभरातुन मनसैनिक येणार आहेत. राजसाहेबांचा विचार ऐकणार आहेत आणि पुढची दिशा ही ठरवणार आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर राजसाहेब बोलतील असं वाटतं, असं राजू पाटील म्हणालेत.

Published on: Mar 22, 2023 07:49 AM
मुख्यमंत्र्यांनी तो आदेश दिला अन् मी…; मंत्री अब्दुल सत्तार नेमकं काय म्हणाले?
या अधिवेशनातून शेतकऱ्याला काहीही… अमोल मिटकरी यांचा आरोप