रामाला जो वेगळं करेल तो रावण, आजपासून ‘जय सियाराम…’, मनसेच्या स्टेजवरून जावेद अख्तर यांची फटकेबाजी
मी 11 वर्षा पूर्वी बसलेलो तेव्हा हा संपूर्ण पार्क हा काळा कुट्ट दिसतं होता. कळत नाही आज 11 वर्ष झाली. इतक्या वर्षानंतर सलीम जावेद ही जोडी आली. रितेश देशमुखने ही प्रश्न विचार असा आग्रह केला असे राज ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला जावेद अख्तर यांनी काय उत्तर दिले पाहा.
मुंबई | 9 नोव्हेंबर 2023 : काही लोक आश्चर्यचकित झाले असतील की राज ठाकरे यांना अजून कोणी दुसरा सापडलं नाही का बोलवायला? याची दोन कारणे आहेत. एक तर आमची चांगली मैत्री आहे आणि दुसरी गोष्ट ही की मी राम आणि सीता यांना मानतो. काही गोष्टी स्पष्टपणे बोलल्या पाहिजेत. माझ्यासारखे नास्तिक आहेत ते सुद्धा त्यांना मानतात. हा प्रत्येकाच्या आस्थेचा विषय आहे. जेव्हा आपण मर्यादा पुरुषोत्तम यांची गोष्ट करतो तेव्हा ते राम आणि सीता हेच आहेत. रामायणामध्ये राम आणि त्यांचे भावंड हे नातं सुद्धा अद्भुत आहे. रामाला जो वेगळं करेल तो रावण… जय सियाराम. आज पासून जय सियाराम हेच म्हणायचं अशी शाब्दिक फटकेबाजी प्रसिद्ध संवाद लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी केली. मनसेच्या वतीने शिवाजीपार्क येथे दीपोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांचे आभारही मानले.