चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ टीकेला रविंद्र धंगेकर यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, मी नेहमी म्हणतो…

| Updated on: Mar 09, 2023 | 2:10 PM

कसबा पोटनिवडणुकीत रविंद्र धंगेकर यांनी विजय खेचून आणला. भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या कसब्यात काँग्रेसचे उमेदवार असणारे रविंद्र धंगेकर यांचा विजय झाला. महाविकास आघाडीच्या या विजयाची राज्यभर चर्चा झाली. आज पहिल्यांदाच धंगेकर विधिमंडळात आले. पाहा...

मुंबई : सध्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशवन सुरू आहे. या अधिवेशनात पुण्यातील कसबा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रविंद्र धंगेकर यांनी आज हजेरी लावली. निवडून आल्यानंतर धंगेकर आज पहिल्यांदाच विधिमंडळात आले. आज त्यांनी आमदारकीची शपथ घेतली. त्यानंतर रविंद्र धंगेकर यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी विचारलेल्या Who is Dhangekar? या प्रश्नाला उत्तर दिलं. ते म्हणाले मी नेहमी म्हणतो, मी रवी धंगेकर!, असं रविंद्र धंगेकर म्हणाले.

Published on: Mar 09, 2023 02:08 PM
सामना हे कुठं वृत्तपत्र आहे? मुनगंटीवार यांचे टीकेला उत्तर
राज ठाकरे ठाण्यात राजकीय घडामोडींवर तोफ डागणार, बघा मनसे वर्धापन दिनाची तयारी