रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी महायुतीत आम्ही असलो तरी आम्हाला अजून कोणी चर्चेसाठी बोलावलेले नाही.त्याचं तिघांचं मिठना तिथं आमच्यापर्यंत अजूनही कोणी आलेले नाही. आम्हाला आमची जिथं ताकद आहे तिथे जागा मिळाव्यात निदान 34 ते 35 जागा आम्हाला मिळायला हव्यात अशी आमची आशा आहे. जर आम्हाला बोलावणं आले नाही तरी आम्ही आमच्या बळावर 288 जागा लढायला मोकळे आहोत असेही महादेव जानकर यांनी म्हटले आहे. मी माझ्या पायावर खंबीर आहे. मी माझ्या ताकदीने दहा ते बारा आमदार निवडून आणू शकतो असे महादेव जानकर यांनी म्हटले आहे.महादेव जानकर यांनी लोकसभा निवडणूकीच्या वेळी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यांना जागा देण्या संदर्भात चर्चा देखील सुरु होती. अशात त्यांना महायुतीने आपल्यात खेचले. आता त्यांनी महाविकास आघाडीत जाणार नसल्याचे म्हटले आहे. महाविकास आघाडी जरा जास्तच हवेत असल्याचे ते म्हणाले आहेत.