ओवेसींच्या सभेत औरंगजेबाच्या घोषणा; संभाजीराजे छत्रपती म्हणतात,”हे महाराष्ट्राचे संस्कार नाहीत”
संभाजीराजे छत्रपती आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना औरंगजेबारून सुरु असलेल्या राजकारणावर भाष्य केलं आहे. ओवैसी यांच्या भाषणादरम्यान प्रेक्षकांमधून औरंगजेब नावाच्या घोषणा देण्यात आल्याच्या चर्चा आहेत. यावर संभाजीराजे छत्रपती यांनी टीका केली आहे.
नाशिक: संभाजीराजे छत्रपती आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना औरंगजेबारून सुरु असलेल्या राजकारणावर भाष्य केलं आहे. ओवैसी यांच्या भाषणादरम्यान प्रेक्षकांमधून औरंगजेब नावाच्या घोषणा देण्यात आल्याच्या चर्चा आहेत. यावर संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, “कसं काय कुणी औरंगजेबाचं नाव घेऊ शकता? शिवाजी महाराजांना ज्या माणसाने त्रास दिला, संभाजीराजे यांची हत्या केली, त्याचं कुणी कसं उदात्तीकरण करू शकतं? हे दुर्दैव आहे, हे काही महाराष्ट्राचे संस्कार नाही.तुम्हाला जर अभिवादन करायचं असेल, तर तुम्ही शिवाजी महाराजांच्या समधीला जाऊन अभिवादन करा.डॉ. बाबासाहेब आंबेडरांनी रायगडावर जाऊन अभिवादन केलं होतं.”
Published on: Jun 25, 2023 06:20 PM