राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष पदावरून संजय राऊतांचा पवार काका-पुतण्यावर निशाणा, पाहा स्पेशल रिपोर्ट …

| Updated on: Jun 13, 2023 | 7:36 AM

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार यांनी पक्षात नियुक्त्या केल्या असल्या तरी निशाणा मात्र संजय राऊत यांनी साधला.

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार यांनी पक्षात नियुक्त्या केल्या असल्या तरी निशाणा मात्र संजय राऊत यांनी साधला.”शरद पवार यांनी पक्षात बदल केले आहेत. त्यात धक्कादायक असं काहीच वाटत नाही. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही जणांच्या मते शरद पवार यांनी भाकरी फिरवली आहे. पण त्यात काही दम वाटत नाही”, असं दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून म्हटलं आहे. “तसेच शरद पवार यांनी दोन कार्याध्यक्ष नेमले. राष्ट्रीयत्व गमावलेल्या पक्षाला दोन कार्याध्यक्षांची गरज काय?”, असा सवाल संजय राऊत यांनी केला. तर अजित पवार यांच्यावर देखील संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. सामनाच्या या अग्रलेखानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांना फटकारलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मविआमध्ये पुन्हा वाद होणार का? यासाठी पाहा यासंदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट…

Published on: Jun 13, 2023 07:36 AM
सामनाच्या अग्रलेखावरून राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा राऊत यांना टोला; म्हणाला, “कोदंडाचा टाणत्कार”
‘अजित पवार हे राज्यातलं सक्षम नेतृत्व’, ‘या’ भाजप नेत्यानं व्यक्त केला विश्वास