हा सत्तासंघर्ष नाही तर चोरांबरोबरची लढाई!; संजय राऊत असं का म्हणाले?
Sanjay Raut : सत्तासंघर्षावरील सुनावणीवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर टीका केली आहे. ते काय म्हणालेत? पाहा...
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होतेय.त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर टीका केली आहे. “ही सत्तासंघर्षाची लढाई नाही. तर चोरांबरोबरची लढाई आहे. चोर डाकू यांना सत्ताधाऱ्यांनी बळ दिले आहे. त्यांच्या विरोधातलीवही लढाई आहे. अंतिम विजय खऱ्या शिवसेनेचा होईल. बोगस लोकांचा नाही!”, असं संजय राऊत म्हणालेत. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. याआधी सत्ताधाऱ्यांनी चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. यावरही राऊत बोललेत.”हे सरकार घटनाबाह्य आहे. अशा सरकारच्या चहापानाच्या कार्यक्पमाला काय जायचं?”, असं ते बोललेत.
Published on: Feb 28, 2023 12:02 PM