मुंबई : कालच्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी आमची इच्छा असेल तोपर्यंत महाविकास आघाडीमध्ये राहू असं म्हटलं होतं. यावर “संजय राऊत हेच मागे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमची आघाडी 25 वर्षे टिकणार असं म्हणायचे,” असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांना प्रश्न विचारताच त्यांनी आपल्या विधानावरून यू टर्न घेतला आहे. अजितदादा बरोबर बोलत आहे. अजित पवार महाराष्ट्रातील बिग बी आहेत. महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक आहेत ते. काल शिवसेनेचा मेळावा होता. त्यात जो विचार मांडायला हवा तसा तो मांडला. काल मी स्पष्ट सांगितलं. उद्धव ठाकरेंसमोर बोललो. फक्त काय ते शिंदे मिंध्यांकडेच फेव्हिकॉलचा जोड असतो असं नाही. महाविकास आघाडीकडेही आहे फेव्हिकॉलचा जोड आहे, असं त्यांनी सांगितलं.