“फार नाकाने कांदे सोलू नका…” संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांना इशारा

| Updated on: Jun 22, 2023 | 2:05 PM

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारमधील नेत्यांच्या घोटाळ्यांची यादी जाहीर करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. आमदार राहुल कुल यांच्या 500 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाचे पुरावे माझ्याकडे आहेत. यासंदर्भात काल आणि परवा ईडीकडे माहिती पोहोचली आहे. याची माझ्याकडे ईडीची पोचपावती आहे. राहुल कुल हे भाजपाचे दौंडचे आमदार आहे. देवेंद्र फडणवीसांचे एकदमक खास आहेत. मिस्टर फडणवीस यांच्यावर बोला.

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारमधील नेत्यांच्या घोटाळ्यांची यादी जाहीर करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “आमदार राहुल कुल यांच्या 500 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाचे पुरावे माझ्याकडे आहेत. यासंदर्भात काल आणि परवा ईडीकडे माहिती पोहोचली आहे. याची माझ्याकडे ईडीची पोचपावती आहे. राहुल कुल हे भाजपाचे दौंडचे आमदार आहे. देवेंद्र फडणवीसांचे एकदमक खास आहेत. मिस्टर फडणवीस यांच्यावर बोला. झाकीर नाईक विखे पाटलांच्या संस्थेत साडे चार कोटी रुपये का देतो याची चौकशी करावी म्हणून गृहमंत्र्यांनी ईडीला पत्र लिहावं. दादा भुसे यांच्या 128 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाची माहिती मिळाली आहे. याचे पुरावे ईडीकडे पोहोचले आहेत. उद्या अब्दुल सत्तारांच्या 750 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचे कागद ईडीकडे जातील, हिंमत असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी यांच्यावर कारवाई करावी.तुम्ही खरोखर सच्चे असाल. तुमच्यावर खरंच संघाचे आणि अटलजींच्या विचारांचे संस्कार असतील तर तुमच्या मांडीला मांडी लावून जे बसलेत ना मुख्यमंत्री आणि त्यांची पोरं-टोरं हे खरे कोव्हीड घोटाळ्याचे लाभार्थी आहेत. आम्ही म्हणत नाही की हा घोटाळा झाला. पण तुम्ही हा भ्रष्टाचार झाल्याचं सांगता. तर मग या लाभार्थ्यांवर कारवाई करा. फार नाकाने कांदे सोलू नका, नाहीतर तुमचंच नाक कापलं जाईल,” असं संजय राऊत म्हणालेत.

Published on: Jun 22, 2023 02:05 PM
“बस्स झालं, नवी जबाबदारी द्या”, अजित पवार यांच्या विधानावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझ्या भावाच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत”
‘कोरोना काळात मविआने भ्रष्टाचार केला, मृतांच्या टाळूवरच…’; भाजप खासदाराची बोचरी टीका