Sanjay Raut : ‘वतन के, धर्म के गद्दार..’, मानखुर्दमध्ये लागले संजय राऊतांच्या विरोधातले बॅनर

Sanjay Raut : ‘वतन के, धर्म के गद्दार..’, मानखुर्दमध्ये लागले संजय राऊतांच्या विरोधातले बॅनर

| Updated on: Apr 10, 2025 | 3:59 PM

Mankhurd Mumbai : वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध केल्यानंतर संजय राऊतांच्या विरोधातले बॅनर मुंबईच्या मानखुर्द परिसरात लागलेले बघायला मिळाले आहेत.

खासदार संजय राऊत गद्दार असल्याचे बॅनर मुंबईच्या मानखुर्द परिसरात लागलेले आहेत. वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध केल्यानंतर संजय राऊतांच्या विरोधात ही बॅनरबाजी करण्यात आली. अज्ञात व्यक्तीने राऊतांच्या विरोधात ही बॅनरबाजी केलेली आहे. काल संध्याकाळी हे बॅनर झळकले होते. त्यानंतर आज हे बॅनर्स काढण्यात आलेले आहेत.

मानखुर्द पुला खाली काल रात्री अज्ञात इसमाने खासदार संजय राऊत यांच्या विरोधात बॅनर लावले. वक्फ विधेयकाला केलेल्या विरोधनंतर ही बॅनरबाजी करण्यात आली. ‘वतन के, धर्म के गद्दार, पूर्वजो के गद्दार, वक्फ बिल का विरोध करनेवाले संजय राऊत’ अशा आशयाचे हे बॅनर होते.

Published on: Apr 10, 2025 03:54 PM