“नसबंदीनंतर मुलं होत नाहीत, पण संजय राऊत…”, संजय शिरसाट यांचा हल्लाबोल
"संजय राऊत हा राजकारणामधला प्रेम चोपडा आहे. त्याला काही ना काही बडबड करून, कोणाला नांदू द्यायचं नाही असं असतं. त्यांनी आम्हाला जो खुराडा म्हटलं, ते रमजानमध्ये शीर कुरमा जास्त खाल्ल्यामुळे. त्यांच्यावर कापायचा प्रभाव जास्त झालेला आहे” अशा शब्दात शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी टीका केली.
मुंबई : शिवसेना आमदार संजय शिरसाट यांची संजय राऊत यांच्यावर बोलताना जीभ घसरली आहे. “संजय राऊत हा राजकारणामधला प्रेम चोपडा आहे. त्याला काही ना काही बडबड करून, कोणाला नांदू द्यायचं नाही असं असतं. त्यांनी आम्हाला जो खुराडा म्हटलं, ते रमजानमध्ये शीर कुरमा जास्त खाल्ल्यामुळे. त्यांच्यावर कापायचा प्रभाव जास्त झालेला आहे” अशा शब्दात संजय शिरसाट यांनी टीका केली. तसेच “ज्याची नसबंदी झालेली असते, ज्याला मुलं होत नाही असं म्हणतात, मात्र संजय राऊत असा एक चमत्कार आहे जो नसबंदी झाल्यानंतरही आम्हाला मुल होईल असं सांगण्याचा पर्याय आहे” अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.