“निवडणुकांसाठी औरंगजेबाची गरज, हे तुमच्या कथातथित हिंदुत्वाचं दुर्देव”, संजय राऊत यांचा फडणवीसांवर हल्लाबोल

| Updated on: Jun 08, 2023 | 12:30 PM

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी संजय राऊत यांनी कोल्हापुरातील हिंसाचारवरून पुन्हा एकदा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

औरंगाबाद : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी संजय राऊत यांनी कोल्हापुरातील हिंसाचारवरून पुन्हा एकदा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “तुमचं सरकार घटनाबाह्य असलं तरी तुम्ही सत्तेत आहात. त्यामुळे राज्यातील जनतेच्या मालमत्तेचं, जनतेच्या जिवीताचं संरक्षण करणं हे तुमचं कर्तव्य आहे. पण तुम्ही दंगली घडवत आहात. कारण भविष्यातील निवडणुकांवर तुमचा डोळा आहे. तुम्हाला तुमच्या राजकारणासाठी औरंजेब लागतो हे तुमच्या तथाकथित हिंदुत्वाचं दुर्देव आहे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. “तसेच तुमचं इंटेलिजन्स फेल आहे. तुमचं गृहखातं फेल आहे. आम्ही पत्रकार आहोत. आम्ही राजकारणात आहोत. आम्ही महाराष्ट्रावर राज्य केलं आहे. आम्हालाही राज्याच्या कानाकोपऱ्यात काय चाललं याची माहिती आहे. उलट तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आम्ही काय सांगतो ते तुम्ही करत नाही. तुम्ही फक्त कायदा आणि पोलीस यंत्रणा विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी वापरत आहात. गुंडाच्या मुसक्या आवळत नाही”, असं संजय राऊत म्हणाले.

“देवेंद्र फडणवीस खरंच गृहमंत्री आहात का?विचारा जरा स्वत:ला”, संजय राऊत यांचा घणाघात
“औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार” निलेश राणेंच्या वादग्रस्त ट्वीटनं नवा वाद