Sujit Patkar: जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात सत्र न्यायालयाचा सुजित पाटकरांना दे धक्का, अटकपूर्व जामीन फेटाळला
कोरोना महामारीच्या काळामध्ये बॉडी बॅग खरेदीत घोटाळा प्रकरणात माजी महापौर तथा ठाकरे गटाच्या महिला नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जम्बो कोविड सेंटरमध्ये शंभर कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरणी खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर हे सध्या जेलमध्ये आहेत.
मुंबई, 12 ऑगस्ट 2023 | ठाकरे गटाला सध्या धक्क्यावर धक्के बसत आहेत. घोटाळ्याच्या आरोपावरून ठाकरे गटातील अनेक नेते सध्या न्यायालयाच्या फेऱ्यात अडकले आहेत. तर काहींवर गुन्हे दाखल झाले आहेत. कोरोना महामारीच्या काळामध्ये बॉडी बॅग खरेदीत घोटाळा प्रकरणात माजी महापौर तथा ठाकरे गटाच्या महिला नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जम्बो कोविड सेंटरमध्ये शंभर कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरणी खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर हे सध्या जेलमध्ये आहेत. पाटकर यांनी लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या नावाखाली जंबो कोव्हिड सेंटरमध्ये शंभर कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाकडे केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे आता पाटकर यांचा तरूंगातील मुक्काम वाढला असून त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.