Video : बाळासाहेबआणि शिवसेनेवर जेवढा अधिकार ठाकरे परिवाराचा तितकाच प्रत्येक शिवसैनिकाचा-शंभूराज देसाई

Video : बाळासाहेबआणि शिवसेनेवर जेवढा अधिकार ठाकरे परिवाराचा तितकाच प्रत्येक शिवसैनिकाचा-शंभूराज देसाई

| Edited By: | Updated on: Jul 26, 2022 | 4:39 PM

माजी गृहराज्यमंत्री आणि शिंदे गटातील आमदार शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) संजय राऊतांची भाषा बोलू नये. अडीच वर्षात महाविकास आघाडीत आमची कोंडी झाली. उद्धव ठाकरेंबद्दल आदाराची भावना त्यांनी आम्हाला पालापाचोळा म्हणू नये”, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. “आम्ही शिवसेनेसाठी अनेक वर्षे काम केलं. एकनाथ शिंदेनी वेळोवेळी […]

माजी गृहराज्यमंत्री आणि शिंदे गटातील आमदार शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) संजय राऊतांची भाषा बोलू नये. अडीच वर्षात महाविकास आघाडीत आमची कोंडी झाली. उद्धव ठाकरेंबद्दल आदाराची भावना त्यांनी आम्हाला पालापाचोळा म्हणू नये”, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. “आम्ही शिवसेनेसाठी अनेक वर्षे काम केलं. एकनाथ शिंदेनी वेळोवेळी उद्धव ठाकरेंना कल्पना दिली होती. शिवसेनेचे आमदार राष्ट्रवादीवर नाराज असल्यास वेळोवेळी सांगितलं. शिवसेना पोखरण्याचं काम सध्या सुरू आहे. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना वाचवण्याचं आम्ही काम केलं. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) राष्ट्रीय आणि युगपुरुष आहेत. बाळासाहेबांना एका कुटुंबापूर्ती मर्यादीत करू नये. बाळासाहेबांवर आणि शिवसेनेवर जेवढा अधिकार ठाकरे परिवाराचा तितकाच प्रत्येक शिवसैनिकाचा आहे”,असं शंभूराज देसाई म्हणाले आहे.

Published on: Jul 26, 2022 11:41 AM