शिंदे गट की शिवसेना? दसरा मेळावा कोणाचा?; शरद पवार म्हणतात एकनाथ शिंदेंनाही अधिकार पण…

| Updated on: Sep 19, 2022 | 12:37 PM

सध्या दसरा मेळाव्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे.  दसरा मेळावा घेण्यावरून शिवसेना आणि शिंदे  गट आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई :  सध्या दसरा मेळाव्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे.  दसरा मेळावा घेण्यावरून शिवसेना (Shiv Sena) आणि शिंदे  गट आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. शिवसेना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी आग्रही आहे. दुसरीकडे  शिंदे गटाकडून देखील दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचीच मागणी करण्यात आली होती. मात्र अद्यापही दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कोणाला मिळणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. आता या वादावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपलं रोखठोख मत मांडलं आहे. एकनाथ शिंदेंनाही (Eknath Shinde) दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे.  त्यासाठी त्यांना बीकेसीचं मैदान देण्यात आलं आहे. मात्र शिवाजी पार्क म्हटलं की शिवसेनाच असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं आहे.

Published on: Sep 19, 2022 12:25 PM
Gram Panchayat Election 2022 : नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायत निकालात महिलांची बाजी! बिनविरोध निवडून आलेल्या 8 सरपंचांपैकी 6 महिला
Video | मुंबईच्या शौचालयातही एवढी घाण नाही… रामदास कदमांवर कुणाची सणकून टीका?