मुख्यमंत्री याचा अर्थ आता करप्ट मॅन; आदित्य ठाकरे यांचा शिंदेंवर हल्ला

| Updated on: Mar 25, 2023 | 1:56 PM

उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. शिंदे हे आता करप्ट मॅन आहेत.

मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार येऊन 8 महिने ओलंडत आहेत. मात्र अजूनही महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. यावरून उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. शिंदे हे आता करप्ट मॅन आहेत. त्यांच्यात राज्यात रखडलेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका घ्यायची हिंमत नाही, असे म्हटलं आहे.

ज्या माणसाकडे निवडणुका घ्यायची हिंमत नाही, त्याच्याकडे पारदर्शक व्यवहाराची काय अपेक्षा करणार असो सवालही आदित्य ठाकरे यांनी केला आहे. ज्यापद्धतीने मुंबई महानगर पालिकेची चौकशी केली तशीच नागपूर महानगर पालिका, नवी मुंबई महानगर पालिका, ठाणे आणि इतर महानगर पालिकेची चौकशीही करावी असे आवाहन देखील आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे.

Published on: Mar 25, 2023 01:56 PM
माफीच्या मुद्द्यावर राहुल गांधी म्हणाले, माझं नाव सावरकर नाही, माझं नाव गांधी…
सामनाचा अग्रलेख म्हणजे गांजा-चिलीम ओढणाऱ्याने लिहिलेला अग्रलेख; भाजपच्या नेत्याचं टीकास्त्र